बेळगाव येथील एलआयसी विकास अधिकारी आणि मलिकवाड गावचे सुपुत्र सुधीर रावसो पाटील यांना आदर्श समाजसेवा पुरस्कार जाहीर झाला आहे. उद्या शनिवार दिनांक 30 एप्रिल रोजी येथील मुनिसुव्रत नाथ दिगंबर जैन मंदिर कमिटीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
कोणत्याही फळाची कौतुकाची अपेक्षा न करता सामाजिक काम करत असलेल्या सुधीर पाटील यांना येथील जैन समाजाच्या वतीने मिळत असलेला पुरस्कार नक्कीच आदर्शवत आहे. अशा या व्यक्तीला पुरस्कार मिळत असल्याने नागरिकांमधून कौतुक होत आहे.