मेलगे गल्ली येथे आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी मराठा समाज सुधारणा मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर मौनव्रत काढून त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी या कार्यक्रमाला गणेश दड्डीकर महेश जुवेकर मराठा समाज अध्यक्ष प्रकाश मरगाळे ईश्वर लगाडे नारायण पाटील विजय जाधव कविता देसाई राजू मरवे यांच्यासह इतर उपस्थित होते.