बेळगाव :
राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास शासकीय कागदपत्रांची आवश्यकता असते.मात्र बऱ्याच लाभार्थ्यांचा आधार कार्ड मध्ये दुरुस्ती असल्याने योजनांचा लाभ घेताना अडचणी येत आहेत. त्यामुळे बीपीएल रेशन कार्ड कामाला प्रारंभ झाला असून आधार कार्ड दुरुस्तीच्या कामाला देखील वेग आला आहे.
मागील काही दिवसांपासून आधार कार्डच्या दुरुस्तीसाठी नागरिकांची धडपड दिसून येत आहे. कर्नाटक वन कार्यालयात आधार कार्ड दुरुस्तीची कामे सुरू आहेत. नावात बदल पत्त्यात बदल जन्मतारीख व मोबाईल क्रमांकामध्ये बदल आदी दुरुस्ती केल्या जात आहे. शहरातील अजमनगर,गोवावेस, टीव्ही सेंटर रिसालदार गल्ली आदी ठिकाणी असलेल्या कर्नाटक बँक कार्यालयात दुरुस्तीसाठी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे