हिंदु धर्मासाठी धगधगणारी ब्राह्मतेजाची ज्वाळा शांत झाली ! – सनातन संस्था
द्वारका येथील शारदापीठ आणि बद्रीकाश्रम येथील ज्योतिष्पीठ यांचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज यांच्या देहत्यागाने हिंदु धर्मासाठी धगधगणारी ब्राह्मतेजाची ज्वाळा शांत झाली आहे, अशा भावपूर्ण शब्दांत सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी शंकराचार्य यांच्या चरणी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
धर्मसम्राट करपात्रीस्वामी यांचे शिष्योत्तम बनून त्यांनी जीवनभर हिंदु धर्माचा प्रचार आणि धर्मरक्षण यांसाठी स्वत:चे जीवन समर्पित केले. आदि शंकराचार्य यांच्या परंपरेतील चार पिठांपैकी दोन पिठांचे शंकराचार्यपद त्यांनी धर्मश्रद्धेने सांभाळले. विविध हिंदु आणि आध्यात्मिक संघटना यांच्यासाठी ते आधारपुरुष होते.
वर्ष २०१५ मध्ये कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणामध्ये सनातन संस्थेवर ज्या वेळी बेजबाबदारपणाचे आरोप झाले, तेव्हा नाशिकच्या कुंभमेळ्यात स्वत: शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी प्रसिद्धीमाध्यमांसमोर सनातन संस्थेचे निर्दाेषत्व सांगणारी भूमिका ठामपणे मांडली. तसेच वेळोवेळी सनातन संस्थेच्या कार्याला त्यांनी शुभाशीर्वाद दिले. भारतात सर्वश्रष्ठ असणार्या शंकराचार्यपदावर आरूढ होऊन त्यांनी केलेले श्रेष्ठ कार्य इतिहास लक्षात ठेवील, असेही श्री. राजहंस यांनी म्हटले आहे.
आपला नम्र,
श्री. चेतन राजहंस,
राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था,
(संपर्क : 77758 58387)