अथणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका हेस्कॉम कंत्राटी कामगाराने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. मंजुनाथ गंगाधर मुतगी वय 30 असे आत्महत्या केलेल्या या युवकाचे नाव आहे.
सदर युवकाने आत्महत्या का केली याबाबत पोलीस तपास करीत आहेत. मंजुनाथ यांनी दोन वर्षांपूर्वी आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला होता त्या कारणानेच आता त्याने आत्महत्या केली असावी का याचा शोध पोलीस घेत असून अधिक तपासानंतर त्याच्या आत्महत्याचे कारण स्पष्ट होणार आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच अथणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.तसेच उत्तरीय तपासणी करिता त्याचा मृतदेह इस्पितळात पाठविला.