बेळगाव रेल्वे स्थानकावर बेवारस आढळलेली मोबाईल चांदीची, चैन वगैरे 17 हजार 700 रुपये किमतीचे साहित्य असलेली बॅग रेल्वे पोलिसांनी संबंधित प्रवाशाला सुखरूप परत केली. रेल्वे पोलीस शिवानंद सरिकर यांना बेळगाव रेल्वे स्थानकावर एक बेवारस बॅग (पिशवी) आढळून आली होती. बॅगेमध्ये व्हिओ मोबाईल, एक चांदीची चेन, मोबाईल चार्जर वगैरे 17,700 रुपये किमतीचे साहित्य आढळून आले. सदर बॅग बेळगाव रेल्वे पोलिस ठाण्यात जमा करून घेण्यात आली. त्यानंतर ती बॅग ज्या प्रवाशाची होती त्याचा शोध घेऊन बॅग त्याच्याकडे सुखरूप सुपूर्द करण्याद्वारे रेल्वे पोलिसांनी आपले कर्तव्य पार पाडले.