शेतकऱ्यांच्या उसाला प्रति तन 4500 सरकारने द्यावे अशा मागणी त्यासह विविध मागण्यांच्या पूर्तते करिता येणाऱ्या 20डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनात जवळपास 5000 शेतकरी एकत्रित जमणार असून आपल्या मागण्या सरकार पुढे मांडणार आहेत.
जर असे न झाल्यास शेतकरी हिंसक रुप धारण करतील असा इशारा शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतील आहे. आज कन्नड साहित्य भवन येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी या पत्रकार परिषदेत कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि हरित सेनेचे प्रदेशाध्यक्ष एच आर बसवराजप्पा यांनी. हा इशारा दिला आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले की शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ करावे सरकारची मालमत्ता जप्त करणाऱ्या बँका अधिकाऱ्यांच्या विरोधात कायदा करावा त्याबरोबरच भाताला प्रत्येक क्विंटल पाचशे रुपये प्रोत्साहन धन दिले जावे अशी मागणी सुवर्ण विधानसौद येथे हिवाळी अधिवेशनात शेतकरी करणार असल्याची माहिती यावेळी दिली.
तसेच 20 डिसेंबर रोजी सुवर्ण विधानसौध समोर उग्र आंदोलन करून सरकारला धडा शिकविणार असा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला यावेळी या पत्रकार परिषदेत राघवेंद्र नायक शशिकांत पडसलगी बाबागौडा पाटील रवी सिद्धमनावर मलिकार्जुन रामदुर्ग यांच्यासह कर्नाटक राज्य रयत शेतकरी संघटनेचे सदस्य उपस्थित होते.