कन्नड रक्षक वेदिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड केल्यानंतर महाराष्ट्र- कर्नाटक बससेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांची खासगी वाहनांकडून पैशाची लुट केली जात होती ही बाब लक्षात घेऊन दोन्ही राज्यांच्या परिवहन महामंडळाकडून आजपासून पुन्हा बससेवा सुरु करण्यात आली आहे .
आज सकाळी बेळगावहून पुण्याला पहिली बस रवाना झाली . त्यानंतर लगचे महाराष्ट्रमधून कोल्हापुरातून कर्नाटकसाठी पहिली बस रवानी झाली.त्यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात ये-जा करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. तब्बल तीन दिवस महाराष्ट्र- कर्नाटक बससेवा बंद असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले होते.