दिनांक ७ व ८ जानेवारी ला कर्नाटक ऑलम्पिक असोसिएशन चे सलग्न असलेला कर्नाटक तायक्वांडो असोसिएशन चे मान्यतानुसार उडपी येथील महात्मा गांधी स्टेडियम मध्ये राज्यस्तरीय ‘करावळी तायक्वांडो चॅम्पियनशिप २०२३’ उत्साहात पार पडला.
स्पर्धा वर्ल्ड तायक्वांदो नियमानुसार क्योरुगी मध्ये सब-ज्युनियर, कॅडेट, ज्युनियर व सीनियर वयोगटात आयोजित केले असून ह्यात राज्यातील २६ जिल्ह्यातून निवडलेले ५८५ तायक्वांदो खेळाडूंचा समावेश होता.
बेळगाव जिल्ह्यातून काकती, बैलहोंगल, सांब्रा, चिकोडी, गोकाक, संकेश्वर व निपाणी येथील निवडलेल्या खेळाडू व्यवस्थापक संदेश पाटील यांच्या नेतृत्वात स्पर्धेत भाग घेऊन अतुलनीय कामगिरी दाखवून राज्यस्तरीय रँकिंग मध्ये जिल्ह्याला द्वितीय स्थान आणण्यात यशस्वी ठरलेत.
बेळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय पंच एडवोकेट प्रभाकर शेडबाळे व सचिव आंतरराष्ट्रीय पंच महादेव मुतनाळे हा यशाबद्दल सहर्ष व्यक्त करून पुढील स्थरावरील यश संपादन करण्यासाठी एप्रिल महिन्यात विशेष प्रशिक्षण कॅम्प ठेवण्यात येईल असे कळवले.
सब ज्युनियर वयोगटात क्योरुगी मुलांचे विभागात वेदांत व्ही. खडबडी २१ किलो घटात रौप्य पदक, घगन शिवपूजीमठ २९ किलो घटात कांस्य पदक, पवनराज दड्डीकर २५ किलो घटात कांस्य पदक, सिद्धार्थगौडा व्ही. गौरी २१ किलो घटात सुवर्ण पदक, मोहम्मद सोहेब चांदशहा २३ किलो घटात रौप्य पदक, मोहम्मद शफी चांदशाह २९ किलो घटात सुवर्ण पदक, अनिक रहमान ४४ किलो घटात कांस्य पदक तर प्रत्युष २९ किलो घटात कांस्य पदक तर तसेच क्योरुगी मुलींचा विभागात जिया एस. पुजारी ३८ किलो घटात सुवर्ण पदक, सानवी एस. पाटील २६ किलो घटात कांस्य पदक, विहानी व्ही. हूंद्रे २४ किलो घटात रौप्य पदक, अद्विका एस. पाटील २६ किलो घटात रौप्य पदक, अवनी ए धोंगडी ३५ किलो घटात कांस्य पदक पटकाविले.
कॅडेट वयोगटात क्योरुगी मुलांचे विभागात आरुष ए. टूमरी ४५ किलो घटात कांस्य पदक, समर्थ दड्डीकर ४५ किलो घटात कांस्य पदक, अथर्व मोरबळे ६१ किलो घटात रौप्य पदक, श्रेयस बी. मोदगेकर ३३ किलो घटात सुवर्ण पदक, अथर्व ए मांगले ५३ किलो घटात कांस्य पदक, प्रध्युम्न्य पी. राणे ४१ किलो घटात कांस्य पदक तर ज्युनिअर वयोगटात आदित्य भट्ट ५९ किलो घटात कांस्य पदक पटकावून यशस्वी ठरले.
यशस्वी खेळाडूंना भारतीय वायुसेनेचे आंतरराष्ट्रीय तायक्वांडो प्रशिक्षक व पंच, तायक्वांदो मास्टर श्रीपाद रवी राव यांचे मोलाचे मार्गदर्शन व सतत प्रशिक्षण तर नॅशनल रेफ्री असलेले सहाय्यक प्रशिक्षक स्वप्निल आर पाटील आणि वैभव आर पाटील यांचे प्रोत्साहन लाभत आहे. यशस्वी तायक्वांडो पटूना राज्याचे माजी युवा सक्षमीकरण आणि क्रीडा मंत्री प्रमोद मध्वराज यांचे हस्ते सन्मानित करण्यात आला.