दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नार्वेकर गल्ली येथील ज्योतिर्लिंग देवस्थानामध्ये जोतिबा देवाला मकर संक्रांति निमित्त तिळगुळाचा पोशाख आणि दागिने अर्पण करण्यात आले.
भोगी दिवशी सकाळी देवाला भोगीचा नैवेद्य दाखविण्यात आला तर मकर संक्रांति दिवशी सकाळी आठ वाजता अभिषेक करून तिळगुळ चा पोशाख आणि दागिने घालून आरती करण्यात आली. यावेळी नागरीकांनी देवाचे दर्शन घेत मंदिरातील भाविकांना तिळगुळाचे वाटप केले