गेल्या महिन्यात 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून बेळगाव शहरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्यादिवशी व्यवस्थित रित्या कायदा आणि सुव्यवस्था हाताळल्यामुळे मार्केट पोलिसांचे पोलीस आयुक्तांनी रोख बक्षीस देऊन अभिनंदन केले आहे.
शुक्रवारी परेडमध्ये बेळगावच्या पोलीस आयुक्त डॉ सिद्धरामाप्पा यांच्या हस्ते मार्केट स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. मार्केट पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल कोकटनूर, मार्केट पोलीस स्टेशनचे पीएसआय महांतेश मठपती, कर्मचारी नवीनकुमार एबी, मल्लिकार्जुन गुंजीकर, नागराज भीम गौडा, आरएस कोलकर, केएस नगराळे मनोहर पाटील, असीर जमादार राजू कडपोला या सर्वांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ कायदा व्यवस्थित हाताळली.
या मार्केट पोलिसांच्या प्रामाणिक कार्याची आणि कर्तव्याची जाणीव लक्षात घेऊन एस. एन. सिद्धरामय्या आयपीएस, पोलिस आयुक्त, बेळगाव शहर यांनी आज परेड ग्राऊंडवर वरील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे 20000 रू. चे रोख पारितोषिक देऊन कौतुक केले.