बेळगाव :कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे एक जून रोजी सकाळी दहा वाजता बिजगर्णी हायस्कूल मध्ये कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
संमेलन उद्घाटन एस.एम.जाधव यांच्या हस्ते होणार आहे.अध्यक्ष म्हणून अॅड नामदेव मोरे उपस्थित राहणार आहेत.फोटो पूजन आर.बी देसाई यांच्या हस्ते
दीपप्रज्वलन पी.आर. गावडे, डॉ.परशराम हुंद्रे, भाऊराव कणबरकर ,के.आर.भाषकळ , यल्लापा बुरुड, यांच्या हस्ते होणार आहे
या निमित्ताने निमंत्रित कवी शिवाजी शिंदे, विठ्ठल कदम, निलेश पारकर, बसवंत शहापूरकर, महादेव खोत, परशराम खेमणे, सुधाकर गावडे, चंद्रशेखर गायकवाड, मोहन पाटील,रुपेश पाटील,भरत गावडे, निलेश शिंदे,मयुर नागेनट्टी, उर्मीला शहा, मनीषा नाडगौडा, प्रा.अशोक आलगुंडी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हे कवी संमेलन रंगणार आहे
मराठी भाषा संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत
वाचन संस्कृती जोपासण्यासाठी लेखन व चिंतन करून मराठी भाषा वृद्धींगत करण्यासाठी वर्षभर कार्यक्रम आयोजित करणे व नवोदित कवींना प्रोत्साहन देण्यासाठीच असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.तरी सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष वाय पी नाईक, मनोहर मोरे, सूरज कणबरकर यांनी केले आहे