भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळची विशेष कार्यकारीनी सभा गुरुवार दिनांक 01/08/2024 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली, या प्रसंगी बोलताना बेळगाव ग्रामीण जिल्हा सरचिटणीस सौ. धनश्री सरदेसाई म्हणाल्या कार्यकारिणी म्हणजे पक्षाच्या झालेल्या कार्यक्रमांचा आढावा व पुढच्या 3 महिन्याचे नियोजन असे स्वरूप या कार्यक्रमाचे असते. पक्षाने दिलेले कार्यक्रम शंभर टक्के यशस्वी करून पक्ष संघटन मजबूत करूया असे त्या म्हणाले.
या प्रसंगी बोलताना भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले जनतेची लुटालूट करणाऱ्या या कर्नाटक काँग्रेस सरकारला उखडून टाकण्यासाठी तसेच अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर पडत असून कर्नाटकाला या सरकारने कंगाल बनविले आहे अश्या भ्रष्ट सरकार विरुद्ध आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी आंदोलनासाठी सज्ज राहावे असे ते म्हणाले.
या प्रसंगी माजी आमदार मनोहर कडोलकर, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश पुरी, एस सी मोर्चा जिल्हाध्यक्ष यल्लेश कोलकार यांनी पण आपले मनोगत व्यक्त केले.
नगरसेविका सौ.विना विजापूरे यांनी तिसऱ्यांदा केंद्रामध्ये मोदी सरकार स्थापन झाल्या बद्दल सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मांडला व मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष श्री लिंगराज हिरेमठ यांनी त्याला अनुमोदन दिले तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हिंदू हिंसावादी आहेत असे हिंदू विरोधी वक्तव्य केले होते त्याबाबत डॉ. गुरुप्रसाद कोतीन यांनी ठराव मांडला त्याला चेतन अंगडी यांनी अनुमोदन दिले. कार्यकारणी मध्ये पुढच्या तीन महिन्यांच्या कार्यक्रमाबाबत योजना आखण्यात आली. याप्रसंगी बेळवट्टी ग्राम पंचायतचे नूतन भाजपा अध्यक्ष श्रीमती महादेवी परशराम मेदर व उपाध्यक्ष श्री बाळू निंगप्पा पाटील यांचा मंडळाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला, या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव हे होते, आभार प्रदर्शन श्री शडाक्षरी हिरेमठ व श्री संतोष देशनुर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सिद्धापा हुक्केरी यांनी केले. कार्यक्रमाला ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.