No menu items!
Saturday, August 30, 2025

अनंत चतुर्दशी दिवशी पूर्ण दिवस सुट्टी द्या अथवा सकाळ च्या सत्रात शाळा घेण्याची युवा समितीची मागणी

Must read

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग च्या वतीने जिल्हाधिकारी, तसेच जिल्हा शिक्षण अधिकारी यांना मनोहर हुंदरे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.

गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे प्राथमिक व माध्यमिक तसेच महाविद्यालय विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली होती.
त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी देण्यात आलेल्या सुट्टीचे दिवस भरुण काढण्यासाठी शनिवारी पुर्ण दिवस शाळा भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महोदय येत्या शनिवारी म्हणजे 6 सप्टेंबर 2025 रोजी अनंत चतुर्दशी आहे आणि बेळगावात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसेच बेळगाव मध्ये विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी आणि शाळेतून परत घरी जाण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामाना करावा लागणार आहे.
तसेच गणेश विसर्जन सोहळामुळे विद्यार्थी शाळेकडे पाठ फिरवण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण घेतलेल्या निर्णयांचा उपयोग येत्या शनिवारी म्हणजेच 6 सप्टेंबर रोजी होणार नाही.

त्यामुळे शनिवारी शाळा पुर्ण दिवस भरविण्या ऐवजी शाळेला पुर्ण दिवस सुट्टी जाहीर करावी किंवा किमान नेहमीप्रमाणे सकाळच्या सत्रात शाळा भरवावी आणी अनंत चतुर्दशी झाल्यानंतर त्या पुढील येणाऱ्या शनिवारी आपण घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करावी अशी विनंती निवेदनाद्वारे करीत आहोत.

यावेळी युवा समितीचे सरचिटणीस मनोहर हुंदरे , समिती नेते शिवाजी हवळांनाचे, उपाध्यक्ष प्रवीण रेडकर, अशोक घगवे, मोतेश बारदेसकर, सूरज जाधव, इंद्रजित धमनेकर, राजू पाटील, सुधीर शिरोळे, अमोल चौगुले आदी उपस्थित होते.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!