बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर मधील निंगापुर गावातील हुलीकेरे बॅकवॉटरमधून दररोज शालेय विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरु असून अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हि परिस्थिती ओढवल्याचा आरोप ग्रामस्थ करताहेत
बेळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहत असून कित्तूर तालुक्यातील निंगापुर गावातील विद्यार्थ्यांचा पाण्यातून ट्यूब राफ्ट च्या माध्यमातून बॅकवॉटर मधून पुढे जाण्यासाठी जीवघेणा प्रवास सुरु असल्याचे निदर्शनात आले आहे. गेल्या 20 वर्षांपासून निंगापूर येथील नागरिक याठिकाणी पूल बांधण्यासाठी अधिकाऱ्यांकडे दाद मागत आहेत, पण अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे याठिकाणी पुलाचे काम न झाल्याने मुसळधार पावसामुळे हुलीकेरेचे बॅकवॉटर ओलांडण्यासाठी विद्यार्थ्यांना धडपड करावी लागत आहे.
या भागातील विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी रबर ट्यूबच्या साहाय्याने बॅकवॉटर चा टप्पा पार करत असून एकीकडे मुसळधार पाऊस, तर दुसरीकडे शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची सर्कस सुरू आहे. हि समस्याच प्रत्येक पावसाळ्यात उद्भवते..
या तलावात दररोज पावसाळ्यात 10 विद्यार्थी ट्यूब राफ्टवर बसून जीवघेणा प्रवास करून शाळेत येतात. तसेच नागरिकांचेही यामुळे अनेक हाल होत असून अधिकाऱ्यांनी तातडीने या समस्येकडे लक्ष पुरवून पूल बांधण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.