बेळगाव : समर्थनम दिव्यांग संस्था आणि केएलएस गोगटमहाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दि. ९ रोजी केएलएस गोगटे महाविद्यालयाच्या आवारात उद्योग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये ३० हून अधिक कंपन्या सहभागी होणार असून याचा लाभ घेण्याचे आवाहन समर्थनम दिव्यांग संस्थेकडून करण्यात आले आहे. ही संस्था दिव्यांग, आर्थिकरीत्या मागास असणाऱ्यांच्या विकासासाठी गेल्या २७ वर्षांपासून कार्यरत आहे. गुणवंत, बेरोजगार, दिव्यांगांना, सामान्य विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केएलएस संस्थेच्या गोगटे महाविद्यालयाच्या सहकार्याने हा उद्योग मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. एसएसएलसी, पीयूसी, आयटीआय, डिप्लोमा, कोणत्याही शाखेतील पदवीधर, पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांना तसेच शारीरिक अपंग असलेल्या तसेच सामान्य विद्यार्थ्यांसाठी या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे, या उद्योग मेळाव्यात बँकिंग, आर्थिक संस्था, आयटी, बीपीओ, रिटेल, हॉस्पिटॅलिटी व इतर उत्पादन क्षेत्रातील कंपन्या सहभागी होणार आहेत. सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत मेळावा आयोजित करण्यात आला आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे
बेरोजगारांसाठी ९ रोजी उद्योग मेळावा गोगटे वाणिज्य महाविद्यालयाच्या आवारात आयोजन
By Akshata Naik
Must read
Previous articleजीव मुठीत धरून मुलांचा शाळेसाठी प्रवास!
Next articleशाळा सुधारणा समितीची बैठक