तिलारी धरण महाराष्ट्र कालव्याने नदीला जोडण्याच्या प्रकल्पा संबंधीत गत महिन्यात चंदगडचे स्थानिक आमदार तसेच बेळगांव चे प्रचलित खासदार यांच्यात औपचारिक समन्वयाची बैठक पार पडली असून या विषयावरून चंडगड येथील एका साखर कारखान्याचे संचालाक रामसिंग खोरा टे यांनी या विषयाचं स्वसोईस्कर राजकारण साधण्यासाठी, भांडवल करण्यासाठी वादग्रस्त वक्तव्य करून सबंध सीमाभागातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत .आणि चंडगडकर,बेळगांवकर यांच्या सलोख्यावर शब्दमारा केला आहे. त्यामुळे या वक्तव्याची निर्भत्सना करून त्या व्यक्तीचा धिक्कार करण्यासाठी रस्त्यावर चंदगडकर व बेळगांवकर उतरून निषेध केला गेला
या निषेध जमावात, मोर्चात तुडये, बीजगर्णी, बेळवट्टी, बाची,बडस, कुद्रेमनी,शेन्नोळी, तुरमुरी, उचगांव,बेळगुंदी आदी सिमालगतच्या गावातील शेतकर्यांनी बेळगांव चे माजी महापौर श्री शिवाजी सुंठकर यांच्या नेतृत्वाखाली सहभाग घेतला होता