अस्मिता क्रिएशन्स या चित्रपट संस्थेद्वारे आयोजित करण्यात आलेले अन्विता या नवीन चित्रपटाचे ऑडिशन्स अगदी धामधुमीत पार पडले फक्त बेळगावमधीलच नाही तर कोल्हापूर सांगली कराड सातारा पुणे मुंबई होऊनही कलाकारांनी या ऑडिशनसाठी हजेरी लावली होती शनिवार दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी या ऑडिशन्सच्या सोहळ्याचे उद्घाटन उत्तर कर्नाटका फिल्म चेंबूर ऑफ कॉमर्स चे डॉक्टर शंकर सुगते सेक्रेटरी ओम किरण यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एंजल फाउंडेशनच्या सौ मीना बेनके, ऍडव्होकेट अश्विनी नावगेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते तसेच अन्विता या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू करण्यात येईल व या चित्रपटात बेळगाव मधील स्थानिक होतकरू व उदयोन्मुख कलाकारांना संधी देण्यात येणार आहे असे अस्मिता क्रिएशन्सचे सर्वेसर्वा राजेश गणपती लोहार यांनी सांगितले त्याचप्रमाणे या चित्रपटाच्या कथेबद्दल लेखक दिग्दर्शक संतोष चंद्रकांत सुतार यांनी जमलेल्या कलाकार मंडळी यांना माहिती दिली अस्मिता क्रिएशन्स ही एकमेव चित्रपट निर्मिती संस्था आहे जी बेळगाव मध्ये तळागाळात दडलेल्या कराकरांना नावारूपाला आणण्याचे कार्य नेहमीच करणार असे यावेळी त्यांनी सांगितले 300 हून अधिक कलाकारांनी या ऑडिशन होते आपले अभिनय प्रदर्शन केले तसेच ऑडिशन मध्ये सहभागी झालेल्या कलाकारांना मेंबरही करून घेण्यात आले रविवार दिनांक 6 ऑक्टोबर 2024 सायंकाळी सात वाजता या कार्यक्रमाची सांगता झाली उपस्थित सर्व मान्यवर व कलाकारांचे राजेश लोहार यांनी आभार मानले तसेच सूत्रसंचालन संतोष सुतार यांनी केले व आभार प्रदर्शन अतीत बेलेकर यांनी केले याप्रसंगी अस्मिता क्रिएशनचे, मॅनेजर अतिथ बेलेकर,एडिटर प्रशांत शेबण्णावर, कन्नड चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण सुतार, अभिनेता शशिकांत नाईक, महादेव होनगेकर शिवराज पाटील साक्षी कणबर्गी, अर्चना पाटणेकर निखिल शिंदे विठ्ठल तोरळकर सुमित सुतार अमित लोहार अँथोनी डिसिलवा इत्यादी सदस्य उपस्थित होते.