येळ्ळूर : येळ्ळूर साहित्य संघाच्यावतीने देण्यात येणारा कै. गंगुबाईआप्पासाहेब गुरव विशेष साहित्य पुरस्कार ५ जानेवारी २०२५ रोजी होणाऱ्या साहित्य संमेलनात देण्यात येणार असून पुरस्काराचे स्वरुप ७००० रुपये रोख, मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे. याचे पुरस्कर्ते उद्योगपती आप्पासाहेब गुरव असून त्यांची आजी कै. गंगुबाई आ. गुरव यांच्या नावे हा पुरस्कार देण्यात येतो. ग्रामीण भागातील स्त्रीचे चित्रण उठावदारपणे मांडण्यात आलेल्या साहित्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. तरी मराठी साहित्यातील कथा, कादंबरी, कविता, नाटक आदी साहित्यकारांनी अशा विषयांचे चित्रण केलेले साहित्य शनिवार दि. ३० नोव्हेंबर २०२४ पूर्वी खालील पत्त्यावर पाठवावे, असे आवाहन साहित्य संमेलन संघाच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी परशराम मोटराचे यांच्याशी संपर्क साधावा.