“तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार” हा दिव्य संदेश देणारे व ‘हे जग सुखी व्हावे व आपलं हिंदुस्तान हे राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे प्रगतीपथावर जावे’, असा दिव्य संकल्प देणारे जीवन विद्येचे शिल्पकार विश्वसंत सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या ५० अनुयायांद्वारे *बेळगाव शहर, ग्रामीण व आसपासच्या तालुक्यातील (चंदगड, खानापूर) विद्यार्थ्यांना जीवनविद्येचे अमूल्य मार्गदर्शन विनामूल्य करण्यात आले. शाळा-महाविद्यालया मधून एकूण *२४५ कार्यक्रम* करण्यात आले. यात एकूण ३५८०६ विद्यार्थी व १,४२४ शिक्षक-कर्मचारी यांनी जीवनविद्येच्या अमूल्य मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
या दौऱ्यास विविध शाळा, महाविद्यालयातील संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. तसेच कार्यक्रमास उपस्थित सर्वांना ‘सर्वांसाठी जीवनविद्या ‘ ही विद्यार्थ्यांसाठी असलेली पुस्तिका विनामूल्य देण्यात आली.
सदर दौरा यशस्वी करण्यासाठी जीवनविद्या मिशन बेळगाव शाखेचे पदाधिकारी, अध्यक्ष श्री. शैलेश शिरोडकर व त्यांचे सहकारी नामधारकांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच बेळगांवच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुलक्षणा शिनोलकर आणि त्यांच्या परिवाराचेही मोलाचे सहकार्य लाभले.
सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या आज्ञेने २०१० पासून आता पर्यंत जीवनविद्या मिशन – विद्यार्थी मार्गदर्शन अभियानाद्वारे मार्गदर्शन मिळालेल्या एकूण विद्यार्थी, शिक्षक आणि शाळा यांची संख्या खालीलप्रमाणे:
शाळा- कॉलेज कार्यक्रम – ९२३९
शिक्षक – ६३६०९
विद्यार्थी – १७,५६८१५