सामाजिक आणि पर्यावरण संरक्षणामध्ये वेगळा ठसा उमटवणारे, व्यसनाधीन झालेल्यांना व्यसनमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणारे किरण निपाणीकर यांचे हृदयाघाताने निधन झाले. समाजाला त्यांची आणखी गरज असताना ते निघून गेले. आज त्यांचा बारावा दिवस. त्यानिमित्ताने त्यांच्या बद्दल थोडस
दयाळू आणि सामाजिकदृष्ट्या सक्रिय व्यक्ती म्हणून सुपरिचित असलेले किरण निपाणीकर नेहमीच त्यांच्या सभोवतालच्या लोकांना मदत करण्यास तत्पर असत. त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले होते..
गरजू विद्यार्थी -विद्यार्थिनींना शैक्षणिक मदत मिळवून देण्याबरोबरच हजारो गरीब वंचित लोकांना त्यांनी या हाताचे त्या हाताला कळणार नाही या पद्धतीने मदत करून दिलासा दिला होता. बेळगाव शहरात अनेक ठिकाणी ट्री प्लांटेशन मध्येही त्यांचे योगदान महत्त्वाचे होते
अशा या धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्याचे आकस्मिक निधन झाल्याने सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला या दुसऱ्यांसाठी सामाजिक कार्यात हिराहिरीने भाग घेणाऱ्या अवलियाला डॉ गणपत पाटील यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली
सामाजिक कार्यात हिराहिरीने भाग घेणाऱ्या अवलियाला श्रद्धांजली
