चव्हाट गल्लीतील रंगपंचमी निमित्त जय महाराष्ट्र गीत लावण्याचा ठपका ठेवून मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केल्या संदर्भात सिमाभागातील बेळगावचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे , वैद्यकीय समन्वयक प्राचार्य श्री आनंद आपटेकर यांनी सोमवारी 17.03.25 मुंबई येथे मंत्रालयात पर्यटन मंत्री व सीमाभाग समन्वयक श्री शंभुराजे देसाई यांचे भेट घेऊन , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या नावे निवेदन देण्यात आले . यावेळी मंत्री श्री शंभूराजे देसाई यांनी कर्नाटक सरकारकडून होणाऱ्या मराठी नागरिकांना त्रास होऊ नये या संदर्भात सूचना लवकरात लवकर देण्यात याव्यात असे सूचना देऊ असे आश्वासन श्री आपटेकर यांना देण्यात आले. तीन मराठी युवकांवर गुन्हा नोंद झाला असून अशाप्रकारे चालत राहिलं तर येणाऱ्या काळात युवा कार्यकर्त्यांमध्ये निश्चित संभ्रम व दहशत निर्माण होऊन सार्वजनिक क्षेत्रात त्यांना वावरताना नक्कीच शासकीय अडचणीच्या समोर जावे लागेल त्याचा परिणाम मराठी सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रम घेण्यासाठी कोणी युवा कार्यकर्ते पुढे येणार नाहीत. मंत्री महोदयांनी लगेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून यावर नक्कीच योग्य कारवाई करू असे सांगितले. जय महाराष्ट्र हे गीत अधिकृत असून ते पुऱ्या देशभरात लावले जाते आणि या गाण्यातून जो प्रोत्साहन मिळतोय तो सर्व नागरिकांना ऊर्जा देण्यास सारखा आहे. विविध कार्यक्रमात सदर गीत नक्कीच लावलं जातोय. अशा गीत लावल्यामुळे जर गुन्हा नोंद होत असेल तर नक्कीच ही गोष्ट निषेधार्थ आहे. या घटनेची महाराष्ट्रा सरकारकडून नक्कीच दखल घेऊन कारवाई केली पाहिजे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या संदर्भात निवेदन
By Akshata Naik

Must read
Previous articleसुळेभावीची जत्रा 18 ते 26 मार्च प्रयत्न