खानापूर-लोंढा-रामनगरमार्गे गोव्याला मोठ्या प्रमाणात मांस विक्रीसाठी अवैधरित्या जनावरांची वाहतूक होत असल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. लोंढा रेल्वे फाटकापासून काही अंतरावर अपघातग्रस्त झालेल्या ट्रकमध्ये कोंबून भरलेल्या १२ म्हशी आढळून आल्याने चोरट्या जनावर वाहतुकीचा भांडाफोड झाला आहे. याप्रकरणी खानापूर पोलिसांनी विठ्ठल रामाप्पा चंद्रकोडी (रा. वड्राळ, ता. चिकोडी) याला अटक केली आहे.
खानापूर-रामनगरमार्गावरलोंढानजीक सायंकाळच्या सुमारास एक ट्रक उलटला. या ट्रकमधून अवैद्यरित्या गुरांची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत लोंढा चौकीतील पोलिसांना माहिती मिळताच उपनिरीक्षक निरंजनस्वामी यांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली असता अवैध वाहतुकीचा प्रकार निदर्शनास आला. चार दिवसांपूर्वी अनमोडजवळ अशाच प्रकारे गुरांची वाहतूक होत असताना एका म्हशीने चालत्या ट्रकमधून उडी मारली. गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. तिच्या कलेवराची विल्हेवाट लावण्यासाठीही कुणी थांबले नव्हते