दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या ज्योती सेंट्रल स्कूल, बेळगांव
शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर यांच्या मार्गदर्शनाखाली नर्सरी ते इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची आषाढी एकादशीनिमित्त वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीचा शुभारंभ शाळेच्या प्रांगणातून करण्यात आला. विद्यार्थ्यांनी वारकरी संतांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. शाळेच्या पटांगणातून या दिंडीचा शुभारंभ मुख्याध्यापिका सोनाली कंग्राळकर आणि शालेय पी.आर.ओ. उर्मिला जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाई तसेच तुकाराम महाराज, सोपानदेव, ज्ञानदेव, चोखामेळा, मुक्ताई, जनाई यांच्या वेशभूषा साकारल्या होत्या.
विद्यार्थ्यांची आषाढी एकादशीनिमित्त वारकरी दिंडी
