श्री लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी 11 जुलै रोजी हेस्कॉमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनीयरमनोहर सुतार यांना निवेदन देण्यात आले. व गणेशोत्सव आगमन सोहळा व विसर्जन मिरवणुक मार्गावरील कमी उंचीचे विद्युत खांब बदलून त्या जागी जास्त उंची असलेले विद्युत खांब उभारण्याची मागणी करण्यात आली.
गणेश मूर्तींची उंची जास्त असल्याने गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये विद्युत तारांचा अडथळा निर्माण होत होता. त्यासाठी मागील वर्षी श्री गणेशोत्सव महामंडळाने मागणी केल्याप्रमाणे, जास्त उंची असलेले विद्युत खांब उभारण्यात आले आहेत. परंतु उर्वरित भागांमध्ये व इतर ठिकाणी अजून विद्युत खांब बदलण्यात आले नाहीत. त्यामुळे, गणेशोत्सव मिरवणुकीला विद्युत तारांचा अडथळा निर्माण होत आहे. त्यासाठी, गणेश उत्सवापूर्वी सदर विद्युत खांब बदलण्यात यावेत व त्या जागी जास्त उंची असलेले खांब बसविण्यात यावेत, अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
निवेदनाचा स्वीकार मनोहर सुतार यांनी केला व बेळगांव शहरातील व उपनगरातील मिरवणुक मार्गाबद्दल उपस्थित असलेल्या महामंडळाच्या पदाधिकाऱ्याकडून सविस्तर माहिती घेतली व गणेशोत्सवापूर्वी मिरवणुक मार्गावरील विद्युत खांब बदलण्याची ग्वाही दिली.
महामंडळाचे नगरसेवक गिरीश धोंगडी यांनी मिरवणुकीच्या मार्गावर असलेल्या कमी उंचीच्या विद्युत खांबांमुळे, मोठ्या मूर्ती किंवा देखावे ने-आण करताना अडचणी येतात. त्यामुळे, उंच खांब बसवण्याची मागणी केली मिरवणुकीच्या मार्गावर तात्पुरत्या वीज जोडणीची मागणी, किंवा इतर आवश्यक सोयींसाठी महामंडळ कठीबद्ध आहे असे अधिकाऱ्यांना सांगितले
विजय जाधव यांनी गणेशोत्सव काळात आवश्यक असलेल्या तात्पुरत्या वीज जोडणीसाठी परवानगी मिळवण्यासाठी,कोणत्याही अडचणी निर्माण होऊ नये याची महामंडळाच्या निवेदनाची अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी
लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, नगरसेवक मानपा माजी गट नेते गिरीश धोंगडी, हेमंत हावळ, सुनिल जाधव, ,प्रवीण पाटील, गजानन हांगीरगेकर, सौरभ सावंत,आदित्य पाटील, अरुण पाटील, आदी उपस्थित होते.