गांजा विकणाऱ्या तरुणाला अटक करुन
त्याच्याकडून २२ हजार रुपये किंमतीचा
१,०७४ ग्रॅम गांजा माळमारुती पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मलिकसाब ऊर्फ मलिकजान मकबुलसाब सनदी व नौशाद महबूब सनदी (दोघेही रा. हिरेहट्टीहोळी, ता. खानापूर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
खानापूर तालुक्यातून गांजा आणून बेळगावात विक्री होत असल्याची माहिती माळमारुतीठाण्याचे निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांना मिळाली होती. मलिकसाब हा गांजा घेऊन अलारवाड पुलाजवळ येणार असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. त्यात मलिकसाब हा अलगद सापडला. त्याच्याकडून २२ हजाराचा गांजा, ८०० रुपयांची रोकड व २५ हजार रुपये किंमतीची दुचाकी असा एकूण ४७,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याची कसून चौकशी केली असता त्याने हा गांजा गावातीलच नौशाद याच्याकडून घेतल्याचे सांगितले. त्यामुळे, पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.
नौशादचा शोध सुरु असून त्यालाही लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
२२ हजाराचा गांजा जप्त
