महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्यानंतर बेळगाव आणि सीमाभाग आपल्या हातातून जाईल, या भीतीतून कर्नाटक सरकारने हलगा येथे उभारलेल्या सुवर्णसौधची अवस्था बकाल झाली आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च करुन केवळ दहाइमारतीचे सहा महिन्यांचे विजेचे बिल थकले असून १ कोटी २० लाख रुपये भरण्यासाठी हेस्कॉमने नोटीस पाठवली आहे. महिन्याभरात थकीत बील भरावे, अन्यथा जोडणी कापण्यात येईल, असा इशारा दिला आहे. दिवसांसाठी वापर करण्यात येतो. आता यासरकारच्या महत्त्वाकांक्षी पंच हमी योजनेचा परिणाम
बेळगावमधील पांढरा हत्ती असलेल्या सुवणसौधवरही होत आहे. सुवर्णसौध इमारतीच्या देखभालीसाठी निधी राज्य सरकारने निष्काळजीपणा दाखवला आहे. देखभाल निधीअभावी आधीच अडचणीत असलेल्या सुवर्णसौधला आता हेस्कॉमने शॉक दिला आहे.
राज्यसार्वजनिक बांधकाम विभागाने सुवर्णसौधचे गेल्या सहा महिन्यांचे १ कोटी २० लाख रुपयांचे वीज बिल हेस्कॉमला दिलेले नाही. यासंदर्भात, अधिकाऱ्यांनी सुवर्णसौध देखभाल विभागाला नोटीस बजावली आहे. या महिन्यातच थकीत वीज बिल भरावे, अन्यथा सुवर्णसौधची वीज जोडणी कापली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे