बेळगांव ः मराठी भाषाप्रेमी मंडळ बेळगांव, बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली व केएलईएस हॉस्पिटल या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने येळ्ळूर येथे मंडळाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त रविवार दि. २१ सप्टेंबर रोजी मोफत रक्तगट तपासणी शिबीर पार पडले.
या शिबिरात अठरा वर्षांवरील २२५ विद्यार्थो व
ग्रामस्थांनी स्वेच्छेने रक्त तपासणी करून घेतली. प्रत्येकाला रक्तगट ओळखपत्र देण्यात येईल.
महाराष्ट्र हायस्कूलचे मुख्याध्यापक बबन कानशिडे यांनी प्रास्ताविक व स्वागत करताना कार्यक्रम आयोजनाचा उद्देश सांगितला.
केएलई संस्थेच्या रक्तपेढीचे प्रमुख डॉ. श्रीकांत विरगी यांनी रक्ताची आवश्यकता कोणत्या आजारात असू शकते हे सांगून निशुल्क सरकारी योजनांचा लाभ कसा घेता येतो याबाबत मार्गदर्शन केले.
अनिल चौधरी यांनी रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले.
येळ्ळूर ग्राम पंचायतचे माजी अध्यक्ष सतिश पाटील यांनी येळ्ळूरवासीय याबाबतीत निश्चितपणे अग्रेसर रहातील अशी ग्वाही दिली
मराठी भाषाप्रेमी मंडळ बेळगांवतर्फे डॉ. श्रीकांत विरगी व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
चांगळेश्वरी मंदिरात झालेल्या या शिबिरास डॉ. प्रदीप पाटील, डॉ. तानाजी पाटील, डॉ. परशराम पाटील, डॉ. मनोज दीक्षित, डॉ. संतोष पाटील यांच्यासह नितीन कपिलेश्वरकर, प्रभाकर हलगेकर, कुमार पाटील, सुहास गुर्जर, शिवराज पाटील आदी उपस्थित होते.
शांताराम कुगजी, दौलत कुगजी, रमेश धामणेकर, आकाश हलगेकर, सदानंद हलगेकर आदीनी शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.