मागील 34 वर्षांपासून शरीर सौष्ठवपटू व शरीरसौष्ठव राष्ट्रीय पंच व सामान्य कार्यकर्ता म्हणून कार्यरत असलेले अनिल गुरुनाथ अंबरोळे यांना नुकतेच आयबीबीएफचे सचिव सुरेश कदम यांनी अनिल अंबरोळे यांना आयबीबीएफचे सदस्यपद प्रमाणपत्र सुपूर्द केले, अनिल यांना हे सदस्यपद मिळाले ही एक बेळगांवच्या शरीरसौष्ठव क्षेत्राला मिळालेली नवसंजीवनी आहे. 1989 ते 90 या सालापासून मनपा व्यायाम शाळेत सराव करीत 1996 साली दरम्यान जिल्हा व राज्य पातळीवर स्पर्धेत सहभाग तर राष्ट्रीय पंच म्हणून 2014 साली निवड झाली तर 1996 पासून स्थापना झालेल्या बेळगांव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेत कार्यरत असलेल्या अनिल अंबरोळी यांनी नुतन बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव संघटना व स्पोर्ट्स नावाची नूतन संघटना स्थापन केली व ते त्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष झाले तसेच मनपा व्यायाम शाळेचेही मागील दीड वर्षापासून अध्यक्षपदाची धुरा सांभाळत असून राज्याध्यक्ष डॉ संजय सुंठकर, जिल्हाध्यक्ष महेश सातपुते ,गौरवअध्यक्ष मिहीर पोतदार ,राष्ट्रीय पंच राजेश लोहार , नारायण चौगुले व इतर पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने बेळगांवच्या सर्व शरीर सौष्ठव खेळाडूंना एक राष्ट्रीय व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी त्यांनी नूतन संघटनेचा घेतलेला पुढाकार ही बेळगावकरांच्या सर्वसामान्य शरीरसौष्ठव पटुंना फायद्याचे ठरणार आहे
आयबीबीएफचे नूतन सदस्यपद मिळालेले अनिल गुरुनाथ अंबरोळे.
By Akshata Naik

Must read
Previous articleदुर्गामाता महिला मंडळांमध्ये जातनिहाय जनगणनेबाबत जनजागृती
Next articleश्रीनगरमधील तरुणाची आत्महत्या