श्रीनगरमधील एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली आहे. माळमारुती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकलें नाही.अबुबकर सिकंदर सनदी (वय २३) राहणार श्रीनगर असे त्याचे नाव आहे. बुधवार दि. २4सप्टेंबरच्या सायंकाळी ६ पासून दुसऱ्या दिवशी २५ सप्टेंबरच्या दुपारी २ या वेळेत चौथ्या मजल्यावरील घरात ही घटना घडली आहे. अबुबकरच्या आईने पोलिसात फिर्याद दिली आहे. गेल्या सात- आठ महिन्यांपासून अबुबकर गोव्यात काम करीत होता. आईला भेटण्यासाठी २३ सप्टेंबर रोजी तो बेळगावला आला माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची पुढील तपास करीत आहेत
श्रीनगरमधील तरुणाची आत्महत्या
By Akshata Naik
Must read
Previous articleआयबीबीएफचे नूतन सदस्यपद मिळालेले अनिल गुरुनाथ अंबरोळे.