No menu items!
Monday, October 13, 2025

लोकसभा अचारसंहिता भंग प्रकरणी जामीन मंजूर

Must read

लोकसभा निवडणुक 2024 मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोकसभा उमेदवार महादेव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना धर्मवीर संभाजी महाराज चौकातून मिरवणुकीचे आयोजन केले होते, या मिरवणुकी दरम्यान विना परवानगी जास्त लोक जमविण्यात आले व बैलगाडीतून विनापरवाना फेरी काढण्यात आली, याचा ठपका ठेवत लोकप्रतिनिधी कायदा कलम 125, कलम 127 भारतीय दंड संहिता कलम 505 अधिक दोन असा गुन्हा उमेदवार महादेव पाटील,शुभम शेळके,मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, रेणू किल्लेकर,सरिता पाटील या समिती नेत्यावर कॅम्प पोलीस स्थानकात दाखल करण्यात आला होता,

आज दिनांक 29 सप्टेंबर रोजी वरील खटल्याची सुनावणी पाचव्या अतिरिक्त दिवाणी न्यायालयात होऊन वरील समिती नेत्यांना वीस हजाराच्या जातमुचलक्यावर,तितक्याच रकमेचा जामीन व पुन्हा असा गुन्हा घडणार नाही, या अटीवर न्यायालयाने जामीन मंजूर केला.

या खटल्यात समिती नेत्यांच्या वतीने वकील महेश बिर्जे, वकील बाळासाहेब कागणकर,वकील रिचमन रिकी, वकील वैभव कुट्रे हे काम पहात आहेत, यावेळी मालोजी अष्टेकर,धनंजय पाटील,मनोहर हुंदरे,प्रकाश गडकरी उपस्थित होते.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!