जुगार खेळणाऱ्या सातजणांवर गुन्हा
दाखल करुन त्यांच्याकडून ७,७०० रुपये जप्त करण्यात आले. धामणे (ता. बेळगाव) गावच्या हद्दीत अलारवाड-मच्छे बायपास कच्च्या रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. गुन्हा दाखल झालेल्या संशयितांमध्ये साईराज उमेश बिर्जे, अनिकेत संजय डोलकरी (दोघेही रा. वडगाव), मल्लिकार्जुन नागेश मेदार, श्रीराम महादेव पोटे, ओम रवी आपटेकर, स्वप्नील संतोष देसाई, विनायक प्रकाश गवळी व राजू मोहन बाळेकुंद्री (सर्वजण रा. शहापूर) यांचा समावेश आहे. उपरोक्त सर्वजण तालुक्यातील धामणे गावच्या हद्दीतील अलारवाड-मच्छे बायपास कच्च्या रस्त्यावर बसून जुगार खेळत असल्याची माहिती उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी यांना मिळाली. त्यांनी सहकाऱ्यांसह जाऊन छापा टाकला असता हे सर्वजण जुगार खेळताना रंगेहाथ सापडले. त्यांच्याकडून रोख – रक्कम, पत्ते व अन्य साहित्य जप्त केले. वडगाव पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे.
जुगार अड्ड्यावर छापा; आठजणांवर गुन्हा
