तृतीय पंथाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न
मध्य प्रदेशच्या इंदुरमधून एक धक्कादायक बातमी समोर
आली आहे. याठिकाणी २८ तृतीयपंथीयांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. सर्वांनी फिनाइल प्यायले. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली असून सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एमवाय रुग्णालयात सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या सर्वांनी फिनाइल पितानाचा व्हिडीओ देखील बनला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे संपूर्ण प्रकरण एका तृतीयपंथीयावर झालेल्या कथित बलात्कार आणि खंडणी प्रकरणाशी संबंधित आहे.
नंदलालपुरा येथे दोन तृतीयपंथीयांच्या गटांमध्ये बऱ्याच काळापासून वाद सुरू आहे. येथे एक गट सपना गुरुचा आहे तर दुसरा गट सीमा आणि पायल गुरुचा आहे. दोघांमध्ये अनेकदा वाद होतात. मंगळवारी किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर लक्ष्मी त्रिपाठी देखील इंदूरला आले आणि त्यांनी या वादाबाबत अधिकाऱ्यांची भेट घेतली. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या तृतीयपंथीयांमधील या वादाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. परंतु तपास पूर्ण होऊ शकला नाहीमध्य प्रदेशच्या इंदुरमधून एक धक्कादायक बातमी समोर
आली आहे. याठिकाणी २८ तृतीयपंथीयांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. सर्वांनी फिनाइल प्यायले. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली असून सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एमवाय रुग्णालयात सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या सर्वांनी फिनाइल पितानाचा व्हिडीओ देखील बनला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे संपूर्ण प्रकरण एका तृतीयपंथीयावर झालेल्या कथित बलात्कार आणि खंडणी प्रकरणाशी संबंधित आहे.
नंदलालपुरा येथे दोन तृतीयपंथीयांच्या गटांमध्ये बऱ्याच काळापासून वाद सुरू आहे. येथे एक गट सपना गुरुचा आहे तर दुसरा गट सीमा आणि पायल गुरुचा आहे. दोघांमध्ये अनेकदा वाद होतात. मंगळवारी किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर लक्ष्मी त्रिपाठी देखील इंदूरला आले आणि त्यांनी या वादाबाबत अधिकाऱ्यांची भेट घेतली. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या तृतीयपंथीयांमधील या वादाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. परंतु तपास पूर्ण होऊ शकला नाही