प्रेम प्रकरणातून तरुणाने आत्महत्या
करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बेळकुड गावात उघडकीस आली आहे. प्रज्वल हिरेमठ असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या युवकाचे नाव असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संबंधित तरुणीने प्रज्वलसोबतचे नाते तोडल्याने दुखावलेल्या प्रज्वलने चिठ्ठी लिहून आत्महत्येचा प्रयत्न केला. सदर घटना कुटुंबियांच्या वेळीच लक्षात आल्याने ताबडतोब रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले असून उपचार सुरू आहेत. घटनेची नोंद चिकोडी पोलिस ठाण्यात झाली असून पोलिस पुढील तपास करत आहेत



