भारतीय रोलर स्केटिंग महासंघ , कर्नाटका रोलर स्केटिंग असो व बेळगाम डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग असो चा स्केटर देवेन बामणे याची जागतिक फ्री स्टाईल रोलर स्केटिंग स्पर्धेत भारतीय स्केटिंग संघात निवड झाली आहे ही स्पर्धा सिंगापूर येथे डिसेंबर महिन्यात होणार असुन त्यासाठी देवेन बामणे हा कसून सराव करत आहे के एल ई सोसायटी चे चेअरमन डॉ प्रभाकर कोरे यांनी देवेनचा सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व त्याला मदत करण्यासाठी आश्वासन दिले यावेळी स्केटिंग प्रशिक्षक सुर्यकांत हिंडलगेकर देवेन चे आई वडील विनोद बामणे, ज्योती बामणे व बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असो चे स्केटर्स पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
जागतिक स्केटिंग स्पर्धेत निवड झालेल्या देवेन बामणेचा सत्कार



