बेळगाव- दिनांक १२नोव्हेंबर रोजी श्री काळभैरवनाथ जयंती साजरी करण्यात येत आहे.कपिलेश्वर येथील पुरातन श्री काळभैरवनाथ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री काळभैरवनाथ जयंतीनिमित्ताने उत्सवाचा मुख्य दिवस बुधवारी अभिषेक, श्री काळभैरव जन्मोत्सव, महाआरती, महापूजा,प्रसाद वाटप, सायंकाळी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ज्या भाविकांना काळभैरवनाथ जयंती निमित्त अभिषेक करायचा असल्यास,त्यांनी मंदिरात संपर्क साधावा असे आवाहन मंदिराच्या ट्रस्ट कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिरात बुधवारी श्री काळभैरवनाथ जयंती महोत्सव आयोजन



