दि. 15 व 16 नोव्हेंबर रोजी अमृतसर, येथे पंजाब कराटे असोसिएशन आयोजित 3 री ऑल इंडिया कराटे स्पर्धा पार घेण्यात आली
या स्पर्धेमध्ये पंजाब, महाराष्ट्र, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, जम्मू, मेघालय, हैदराबाद, कर्नाटक, आंध्रप्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, गुजरात, सिक्कीम, झारखंड, केरळ या राज्यातून १००० स्पर्धकांनी काता आणि कुमिते या प्रकार मध्ये सहभाग घेतला,सांगली ची नामवंत
के.सी.के कराटे अकॅडमीने महाराष्ट्रचे नाव राष्ट्रीय पातळीवर दुसरा क्रमांक पटकावला. 30 सुवर्ण , 8 रौप्य, 4 कास्य पदके मिळवली अशी सुवर्ण कामगीरी करत सांगलीच्या महाराष्ट्र व मान उंचावेली आहे.
अन्वी सूर्यवंशी ने कुमिते स्पध्ये मध्ये सुवर्ण पदक तर काता स्पध्ये मध्ये रौप्य पदक पटकावले तर अन्वेष सूर्यवंशी ने काता स्पध्ये मध्ये सुवर्ण पदक तर कुमिते स्पध्ये मध्ये कांस्य पदक पटकावले,,
याबद्दल सर्व सर्व स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे .तसेच के.सी.के कराटे अकॅडमी चे फाऊंडर महेश भोकरे व प्रशिक्षक कपिल बावधनकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
पंजाब येथे राष्ट्रीय कराटे स्पर्धे मध्ये महाराष्ट्र चा दुसरा क्रमांक सांगलीच्या अन्वी सूर्यवंशी आणि अन्वेष सूर्यवंशी ने पटकावले सुवर्ण पदक



