मराठा मंडळ हायस्कूल चव्हाट गल्ली बेळगांव येथे 1998 ते 2000 च्या इयता आठवी ते दहावी ए वर्गातील विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन रविवार दि.14 डिसेंबर रोजी पार पडले. 25 वर्षांनंतर भेटल्यामुळे सर्वांच्या चेह-यावरून आनंद ओसंडून वहात होता.
कार्यक्रमाला माजी शिक्षक एस व्ही चव्हाण टीचर, एम.के.कडेमनी,आर वाय बाळेकुंद्री सर,एस के पोटे सर, वाय एम सुळेभावी सर, आणि मुख्याध्यापक
एम के पाटील सर व विद्यमान सातेरी एम वड्डेबैलकर सर, एस बी जकाती सर, दिलीप वाडकर सर 8 वी ते 10 वी बॅचचा माजी विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि फळांची करंडी देऊन शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांकडून शाळेला मोठा फळा भेट देण्यात आला.शिक्षकांनी या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनीही आपल्या हायस्कूलमधील आठवणी सांगितल्या. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
1998 ते 2000 च्या विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन



