महाशिवरात्री चे औचित्य साधून मराठा एकता संघटनेचे सदस्य मोनाप्पा भास्कर यांच्यावतीने बीजगर्णी गावामध्ये पश्चिम बेळगाव मधील कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कुस्ती मैदानाची सुरुवात फीत कापून करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बीजेपी ग्रामीणचे माजी अध्यक्ष विनय विलास कदम ,मराठा एकता समाजाचे अध्यक्ष नारायण झंगरुचे,अमोल जाधव ,बेळगुंदी चे जिल्हा पंचायत सदस्य मोहन मोरे, गोमटेश चे बापुसो पाटील बीजगर्णी पंचायतचे अध्यक्ष मनोहर बेळगावकर ,एपीएमसीचे माजी अध्यक्ष आप्पा जाधव ,बीजेपी नेते रवी हरगुडे कुद्रेमनी चे चेअरमन संजय पाटील, ,एडवोकेट नामदेव मोरे ,विशाल कोडते , बीजेपी चे गोपाळ पाटील ,कल्लाप्पा पाटील सुभाष पाटील सूर्यकांत चौगुले अण्णा पाटील रामलिंग हलकर्णी आदी उपस्थित होते.
यावेळी विनय विलास कदम यांच्या हस्ते फीत कापून कुस्तीला सुरुवात करण्यात आली. यावेळी पैलवानांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत मैदान मारले. यावेळी बीजगर्णी सह आजूबाजूच्या गावातील कुस्ती प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.