श्री नामदेव दैवकी संस्था खडे बाजार बेळगांव यांच्यातर्फे आज दिनांक 10/03/2022 रोजी महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात नगरसेविका सौ नेत्रावती भागवत व सौ सरिता कोपर्डे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली प्रारंभी समाजातील युवा महिलांनी स्वागत गीत सादर केले सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरसेविका सौ नेत्रावती भागवत यांनी आपले विचार मांडले समाजातील महिलांनी एकत्र येऊन सक्षमपणे कार्यरत राहावे तसेच सावित्रीबाई फुले यांची स्त्री शिक्षणाची तळमळ व समाजातील प्रत्येक तळागळातील महिलेने शिक्षण घेतलेच पाहिजे तसेच स्त्री शिकली पाहिजे म्हणून त्यांनी ज्या हाल-अपेष्टा सोसल्या त्या प्रत्येक स्त्रीला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले तसेच समाजातील प्रत्येक स्त्रीने समाजामध्ये कार्यरत राहून आपले स्थान स्वकर्तुत्वावर निर्माण केले पाहिजे तसेच स्व लता मंगेशकर मदर तेरेसा डॉक्टर आनंदी बाई जोशी सिंधुताई संपकाळ अशा अनेक मान्यवर स्त्री यांच्या कार्याची माहिती दिली तसेच समाजातील महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आले आणि बक्षीस वितरण करण्यात आले तसेच याप्रसंगी समाजातील काही होतकरू महिलांचा सत्कार करण्यात आला श्रीमती प्रभावती मिरजकर यांनी देहदानाचा संकल्प केल्याबद्दल समाजाकडून त्यांचा गौरव करण्यात आला त्यानंतर आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली