बेळगावी : सरकारी जमीन बेकायदा हडप करणाऱ्यांपासून वाचवण्याचा प्रयत्न करत असताना माहिती अधिकार कार्यकर्ते जयंत तिनईकर यांच्यावर एका व्यावसायिकाने भाड्याने घेतलेल्या टोळीने हल्ला केला.
खानापूरच्या हद्दीतील सरकारी जमिनीवर व्यापारी लक्ष्मण शेट्टी यांनी बेकायदेशीरपणे क्लब बांधला होता. ती बेकायदेशीरपणे बळकावल्याचे निदर्शनास आलेल्या तिनईकर यांनी संबंधित विभागाकडून आरटीआय कायद्यांतर्गत जमिनीची कागदपत्रे गोळा केली होती. यामुळे शेट्टी यांना तिनईकर यांच्यावर हल्ला करावा लागला.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार शेट्टीने लोकेश कलबुर्गी याला ५० लाख रुपयांना कामावर ठेवले होते आणि आगाऊ रक्कम म्हणून १.५० लाख रुपये दिले होते.
मार्कंडेय नगर येथील गंगाप्पा गुजनब व भरमा दासनट्टी, खानापूर येथील सुनील दिवतगी व मंजुनाथ होसमनी, टिळकवाडी येथील सचिन येरझारवी, अनगोळ येथील ईश्वर हुबळी व उदयबाग येथील अखिलेश यादव यांनी झाडशहापूरजवळ तिनईकर यांच्यावर ४ मार्च रोजी हल्ला केला होता. तिनईकर हे मॉर्निंग वॉकवरून घरी परतत होते.
याप्रकरणी जखमी तिनईकर यांनी बेळगाव ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली होती
यामध्ये लक्ष्मण शेट्टीचे नाव संशयितांमध्ये आहे.