बेळगाव डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग असोसिएशनच्यावतीने आयोजित ” रोख पारितोषिक जिल्हा रोलर स्केटिंग चॅम्पियनशीप 2022 ” या स्पर्धेला स्केटिंगपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
केएलई सोसायटी संचलित लिंगराज महाविद्यालयाच्या आवारातील स्केटिंग रिंकवर झालेल्या या स्पर्धेत 260 हून अधिक स्केटिंगपटूंनी भाग घेतला होता. येथील श्री शिवाय फाउंडेशन ग्रुप आणि इफिशियंट ग्रुप बेलगाम यांच्यावतीने ही स्पर्धा पुरस्कृत करण्यात आली होती.
स्पर्धेतील विजेत्या स्केटिंगपटूंना प्रमाणपत्र, पदक आणि रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. बेळगाव उपविभागाचे सहाय्यक आयुक्त रवींद्र करलिंगन्नावर, अँटी करप्शन ब्युरोचे एसीपी अडीवेश गुडीगोप्प, बेळगाव डिस्ट्रीक्ट रोलर स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष उमेश कलघटगी, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील, श्रीमती अक्षता पाटील, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलेकर, सामाजिक कार्यकर्ते गणेश दड्डीकर, तुकाराम पाटील, श्रीमती पठाडे, श्रीमती माडीवाले, चौगुले, तसेच श्री शिवाय फाउंडेशन ग्रुप आणि इफिशियंट ग्रुप बेलगामचे सदस्य यांच्या उपस्थितीत स्पर्धेला चालना देण्यात आली
1000 मीटर रिंक रेस स्केटिंग प्रकारात 5 वर्षांखालील वयोगटात मुलांच्या विभागात लोकेश पाटील याने एक सुवर्ण, शौर्य पाटील याने एक रौप्य तर अधिराज कामते याने एक कास्यपदक तसेच मुलींच्या विभागात साई बेळगावकर हिने एक सुवर्ण, द्विती वेसणे हिने एक रौप्य तर गाथा दड्डीकर हिने एक कांस्यपदक मिळविले. 5 ते 7 वयोगटात मुलांच्या विभागात आण्विक शिंगडी याने एक सुवर्ण, श्रीयंश पांडे याने एक रौप्य तर भागार्थ पाटील याने एक कास्यपदक तसेच मुलींच्या विभागात जिया काजी हिने एक सुवर्ण, दिया सोंकद हिने एक रौप्य तर अनन्या पाटील हिने एक कास्य पदक मिळविले