बेळगाव :
कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी rt-pcr चाचणीच्या सक्तीमुळे अनेक अडचणी येत आहेत. बेळगाव ही मुख्य बाजारपेठ असल्याने बेळगाव मधून किराणामाल दूध भाजीपाला चिकन अंडी फुले इत्यादी आयात निर्यात होत असतात. मात्र सीमेवर rt-pcr चाचणी सक्तीची करण्यात आल्याने बेळगावच्या बाजारपेठेवर परिणाम होत आहे त्यामुळे सीमेवर करण्यात आलेले rt-pcr चाचणी बंद करावी आणि त्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस सक्तीचे करावे अशी मागणी बेळगाव ट्रेडर्स फोरम असोसिएशनच्या वतीने व्यापाराने निवेदनाद्वारे केली आहे.
बेळगाव मधून मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे त्यामुळे व्यापार वाणिज्य आणि उद्योग यांच्या हालचाली द्वारे सरकारला यातून महसूल मिळतो आणि सीमावर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांना रोजगार मिळतो. मात्र सीमेवर करण्यात आलेल्या rt-pcr च्या सक्तीमुळे बेळगावच्या बाजारपेठेवर परिणाम होत आहे. त्यामुळे ती rt-pcr ची सक्ती मागे घेऊन त्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस अनिवार्य करावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी बेळगाव ट्रेडर्स फोरम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर,सेवांतीलाल शहा अरुण कुलकर्णी, विकास कलघटगी, राजू खोडा यांच्यावतीने जिल्हाधिकार्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.