खवय्यांना गोवन पद्धतीचा आहार उपलब्ध करून देण्याकरिता येथील आयोजनगर हॉटेल युके 27 मध्ये गोवन फूड फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दिनांक 6 पासून ते रविवार दिनांक 17 जुलै पर्यंत हे फूड फेस्टिवल असणार असून यामध्ये शाकाहारी पदार्थांबरोबरच मांसाहारी पदार्थांची चव देखील खवय्यांना चाखता येणार आहे.
बेळगावातील नागरिकांना गोवन पदार्थाची चव आता हॉटेल यूके 27 मध्ये देखील घेता येणार आहे. येथील फूड फेस्टिवल मध्ये गोवन पद्धतीची मासळी चिकन मटन विविध भाज्या फेस्टिवल मध्ये ठेवल्या आहेत.
तसेच पावसाळ्यात मिळणाऱ्या विविध प्रकाराचे मासळी खेकडे विविध प्रकारचे सूप आपल्याला या फूड फेस्टिवल मध्ये चाख ता येणार आहेत. त्यामुळे खव्ययांनी या फेस्टिवलला एकदा तरी भेट देऊन याचा आस्वाद घ्यावा असे कळविण्यात आले आहे.



