पावसाला सुरुवात झाली की लाईट जाणे ही नेहमीची बाब असून यामुळे पावसाळा आला की अंधारात राहण्याची वेळ नागरिकांवर येते मात्र सदाशिवनगर येथील शेवटचा क्रॉस येथील ट्रांसफार्मर दुरुस्ती मुळे सातत्याने या समस्याला सामोरे जावे लागत असून गुरुवारी संध्याकाळपासून या भागातील ट्रान्सफॉर्मर बंद पडल्याने विद्युत पुरवठा ठप्प करण्यात आला आहे. यामुळे सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी या समस्येबाबत लवकर उपाय योजना करावी अशी विनंती केली आहे.
सदाशिव नगर शेवटच्या क्रॉस येथे ट्रान्सफॉर्मर वारंवार बंद पडत आहे.गुरुवारी संध्याकाळ पासून विद्युत पुरवठा टप्प झाला आहे.. ट्रान्सफॉर्मर वर लोड जास्त पडत आहे असे हेस्कॉम कर्मचार्यानी सांगितले. कायम 2-3 महिन्यात दुरुस्ती होत असते.हेस्कॉम अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.
आमदारांनी दखल घेतली पाहिजे असे नागरिकांचे म्हणणे आहे.
यामुळे हेस्कॉम विभागाच्या समस्येसंदर्भात सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी संबंधित विभागाच्या आमदारांशी संपर्क साधत हा ट्रान्सफॉर्मर नेहमीच अडचणीचा ठरत असून यामुळे नागरिकांना बऱ्याच वेळा समस्यांना सामोरे जावे लागत दुरुस्ती करण्यात यावी व हीसमस्या सोडविण्याचे आवाहन केले. हेस्कॉम विभागाला सार्वजनिक विनंती आहे की आमच्या समस्या शक्य तितक्या सोडवा असे आवाहन केले आहे.