काकती पोलीस स्थानकाच्या हद्दीत एका घराची भिंत मुसळधार पावसाने कोसळली आहे. तसेच ही भिंत एका दोन महिन्या बाळाच्या अंगावर आणि आईच्या अंगावर कोसळल्याने ते या घटनेत बाल बाल बचावले आहेत.
या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने अनेक घरी कोसळली आहेत त्यातच भूतरामहट्टी येथील भिमराय पाटील यांच्या घराची भिंत आज सकाळी कोसळली आहे. मात्र या घटनेत दोन महिन्याचे बाळ आणि आई बचावल्याने मोठा अनर्थ टळला आहे.



