फक्त महिलांकरिता पिंक पॉवर मिट आणि ग्रीट या कार्यक्रमाचे आयोजन पिंक समोसा यांच्यावतीनेकरण्यात आले आहे. सदर कार्यक्रम रविवार दि. १४ रोजी बेळगाव प्रेसिडेन्सी क्लब येथे पार पडणार आहे.
यावेळी महिला व्यवसाय प्रशिक्षक मनी पवित्रा माहिती देणार आहेत. महिलांसाठी शार्क टँक बेळगाव हा एक उपक्रम असून नवीन महिला उद्योजक घडण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे .
ज्या महिला उद्योगांमध्ये सक्रिय आहेत किंवा ज्यांच्याकडे कौशल्य आहे अशा महिला यामध्ये सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी ९७४२०८०७२७ या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे



