No menu items!
Saturday, August 30, 2025

ग्रंथपाल ग्रंथालयाचा कणा आहे -प्रा. स्वरूपा इनामदार

Must read

कोणत्याही ग्रंथालयाचे ग्रंथपाल स्वतः जबाबदारी घेऊन काम करत असतात. पुस्तकांची ठेवण,त्यांचे जतन, हाताळणी ,वाचकांशी सुसंवाद ,साहित्यिक उपक्रमाचे आयोजन अशी विविधांगी कामे काळजीपूर्वक करतात म्हणून ग्रंथपाल हा ग्रंथालयाचा कणा आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका प्रा. स्वरूपा इनामदार यांनी काढले .ग्रंथपाल दिनाच्या निमित्ताने तारांगण व जननी ट्रस्टच्या वतीने आयोजित ग्रंथपाल सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. त्यापुढे म्हणाल्या की, वाचनीय पुस्तके वाचकांपर्यंत पोहचावीत यासाठी ग्रंथपाल प्रयत्न करत असतात. त्यांच्या सत्कार होण ही कौतुकास्पद गोष्ट आहे

तारांगणतर्फे सरस्वती वाचनालय कोरे गल्ली,शहापुर येथे नुकताच ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमात चार ग्रंथपालांचा सन्मान करण्यात आला.ते प्रामाणिकपणे व काळजीपूर्वक काम करतात म्हणूनच ग्रंथालये व्यवस्थितपणे कार्यरत असतात.पुस्तकांच्या सुरक्षिततेबरोबर जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पुस्तके सुस्थितीत पोचावीत यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात.मात्र त्यांचे हे कार्य सहसा दिसून येत नाही. अशा दुर्लक्षित ग्रंथपालांचा योग्य सन्मान व्हावा यासाठी तारांगणच्या संचालीका अरुणा गोजेपाटील यांनी पुढाकार घेतला.ग्रंथपाल दिनानिमीत्त विजया उरणकर-वाड:मय चर्चा मंडळ (किर्लोस्कर रोड), गुरुदास सुवारे – लोकमान्य ग्रंथालय(अनगोळ), निता हावळाणाचे-सार्वजनिक वाचनालय (गणपत गल्ली), व सविता पारनट्टी- सरस्वती वाचनालय (कोरे गल्ली शहापुर) या चार ग्रंथपालांचा शाल व भेटवस्तू देवून सन्मान करण्यात आला.

यावेळी व्यासपिठावर प्रमुख पाहुण्या प्रा.स्वरुपा इनामदार,अध्यक्षा अरुणा गोजेपाटील व सविता पारनट्टी उपस्थीत होत्या.तारांगणच्या ईतर पदाधिकारी जयश्री दिवटे,शारदा भेकणे,अर्चना पाटील उपस्थीत होत्या.

सदर कार्यक्रमात वटपोर्णिमा निमित्ताने घेण्यात आलेल्या सेल्फी विथ रोपटे या स्पर्धेचा बक्षिससमारंभ पार पडला.नयन मंडोळकर – प्रथम, श्रुतीका घोरपडे – द्वितीय, माधवी हिंडलगेकर – तृतीय, मनिषा नाडगौडा व तेजस्विनी बावडेकर – उत्तेजनार्थ अशी बक्षिसे वितरित करण्यात आली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अस्मिता आळतेकर यांनी केले. आभार अरुणा गोजेपाटील यांनी मानले.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!