बेळगाव : मराठा समाजाचे नेते व भाजप कर्नाटक राज्य सचिव श्री. किरण जाधव यांनी कर्नाटक मराठा समाज विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. जी. मुळे यांच्यासोबत सदिच्छा भेट घेतली आणि समाजाच्या विकासासाठी पुढील ध्येयधोरणे व समाजाच्या उन्नतीसाठी नवनवीन योजनांवर चर्चा झाली व मराठा समाज स्वावलंबी कसा बनवावा, मराठा समाजाच्या युवकांना उद्योग क्षेत्राकडे वळविण्यासाठी मार्गदर्शन करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
यावेळी बोलताना डॉ. एम. जी. मुळे म्हणाले की, आपण मराठा समाज एकसंघ करू. समाजासाठी विविध उपक्रम राबवू. समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबवू. प्रत्येक समाजबांधवांच्या घरापर्यंत आपण पोचविण्याचा आपण प्रयत्न करू.
यावेळी शहाजी राजे योजनेबाबत बेळगावमधील मराठा समाजाच्या वतीने किरण जाधव यांनी त्यांचे आभार मानले.
मराठा समाजाच्या विकासासाठी किरण जाधव यांनी दिला एक नारा “एक मराठा सुशिक्षित मराठा”



