गरबा दांडिया चा उत्साह दिवसेंदिवस वाढत असून रोटरी मिडटाऊन तर्फे आयोजित गरबा दांडिया फेस्ट ला मोठा प्रतिसाद लाभत आहे.विविध स्पर्धा आणि मनोरंजन यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या फेस्टचा दुसरा दिवस देखील मोठ्या थाटात पार पडला. बेळगावकरांना या फेस्टचा आनंद अधिकाधिक लुटता यावा यासाठी गरबा दांडिया एन्ट्री फी कमी करण्यात आली असून अवघ्या १५० रुपये प्रवेश शुल्कात फेस्ट चा आनंद लुटता येणार आहे.
महिला मंडळ तसेच संघ संस्था यांच्या माध्यमातून गटांद्वारे य मंडळांना देखील या फेस्ट मध्ये सूट देण्यात येणार आहे. यामुळे नवरात्रीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी महिला मंडळांनी संस्था संघनी मोठ्या उत्साहात सहभागी व्हावे असे आवाहन रोटरी मिडटाऊन तर्फे करण्यात आले आहे. गरबा दांडिया च्या माध्यमातून दररोज स्पर्धकांना बक्षिसांचे वितरण करण्यात येत आहे.
फेस्ट च्या दुसऱ्या दिवशी चित्रकला आणि मेहंदी स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने केवळ गरबा अथवा दांडिया पुरते मर्यादित फेस्ट आयोजित न करता स्पर्धा देखील आयोजित केल्या असून केल्या आहेत.साधारण 45 ते 50 स्पर्धकांच्या उपस्थितीत या स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या याबरोबरच फेस्ट च्य यातिसऱ्या दिवशी सिंगिंग स्पर्धा घेण्यात आल्या.